breaking-newsताज्या घडामोडीपुणे

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

पुणे|महाईन्यूज|प्रतिनिधी|

महाराष्ट्र केसरी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या अंतिम सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा उंचावली आहे. हर्षवर्धनने शैलेश शेळके याचा 3-2 असा पराभव केला आहे. विशेष म्हणजे हर्षवर्धन आणि शैलेश दोघेही वस्ताद काका पवार यांचे शिष्य आहेत. दोघेही पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेत आहेत.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद तर्फे म्हाळूंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे’च्या थरारक आखाड्यात आज गादी व माती अशा दोन्ही विभागातून अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या तालमीतील मल्ल हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके आखाड्यात उतरले होते.

महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत सोमवारी तुल्यबळ, अतीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणांनी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या ४ सेकंदातही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत ‘काटे की टक्कर’ देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली. शैलेशने ज्ञानेश्वरवर ११-१० अशा अतीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत जागा निश्चित केली.

नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत कटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही आजच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. तोडीस तोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धनने महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला होता अटी तटीच्या लढतीत अखेर त्याने विजय मिळवला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button