breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी, अशाप्रकारे करा

पुणे | निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात.

त्यानुसार राज्यात पाचव्या टप्प्यात होणाऱ्या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील.

हेही वाचा    –    ‘यापुढे मी महाराजांची भूमिका करणार नाही’; चिन्मय मांडलेकरने घेतला मोठा निर्णय 

त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

त्यासाठी पात्र मतदार voters.eci.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा Voter Helpline ॲपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button