ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना महापालिका देणार 25 हजारांचे अर्थसहाय्य

पिंपरी चिंचवड | कोरोनामुळे विधवा झालेल्या महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीने पिंपरी- चिंचवड महापालिकेने एक पाऊल उचलले आहे. नागरवस्ती विभागाकडील विधवा अर्थसाहाय्य योजनेत 10 हजार रुपयांऐवजी आता 25 हजार रुपये इतके अर्थसाहाय्य देण्याचे नियोजन करण्यात आल्याने या महिलांना दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या नागरवस्ती विभागाने हा निर्णय घेतला आहे.मार्च 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आली. गेल्या सव्वा वर्षात 4 हजार 354 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. बऱ्याच कुटुंबांतील कर्त्यां व्यतींचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोनाचा संसर्गदरही सध्या पाच टक्क्यांच्या खाली घसरला आहे. मात्र, तिसरी लाट येण्याच्या शक्यतेने शहरातील निर्बंध अद्याप कायम आहेत.

महापालिका नागरवस्ती विकास योजना विभागाकडून महिला आणि बालकल्याण योजनेअंतर्गत महिलांसाठी विविध कल्याणकारी योजना नागरवस्ती राबविल्या जातात. त्या अंतर्गत विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी विधवा अर्थसाहाय्य योजनेतून 10 हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जाते. त्यामध्ये 15 हजार रुपयांनी वाढ करून 25 हजार इतके अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

योजनेच्या अटी-शर्ती!

अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड जोडावे, मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत या दोन्हीपैकी एक पुरावा जोडावा. पतीच्या मृत्य दाखल्याची प्रत जोडावी. कोरोना विषाणूच्य प्रादुर्भावामुळे पतीचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावे. कुटुंबाचे मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखांपर्यंत असल्याबाबतचा तहसीलदारांचे उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्डची प्रत जोडावी. अर्जदार महिलेचे वय 50 पर्यंत असावे. अर्जदार महिलेने यापूर्वी विधवा किंवा घटस्फोटित महिलांनी किरकोळ स्वरूपाचा व्यवसाय करण्यासाठी या योजनेचा लाभ घेतला असल्यास अशा महिलांना लाभाची रक्कम 15 हजार रुपये मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button