ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील सोसायटीधारकांच्या तक्रारींसाठी ‘सारथी’वर स्वतंत्र ‘‘ऍक्सिस’’

आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी मानले आभार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाची हेल्पलाईन सारथी पोर्टलमध्ये सोसायटीधारकांसाठी स्वतंत्र ऍक्सिस देण्यात आला आहे. शहरातील सोसायट्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आणि सोसायटीधारकांच्या तक्रारी मांडण्यासाठी ही सुविधा महापालिकेने दिली आहे. त्यासाठी चिखली-मोशी-चर्‍होली- पिंपरी -चिंचवड- हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने सातत्याने मागण्यांचे गार्‍हाणे मांडले होते. प्रशासकीय स्तरावर आमदार महेश लांडगे यांनी यासाठी पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले आहे.

शहरातील सोसायटी धारक अनेक प्रश्नाने त्रस्त आहेत. यामध्ये महापालिकेकडून पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत सोसायट्यांना विकसकांमार्फत पाणी पुरवठ्याची सोय करावी. हमीपत्र लिहून घेताना पाणीपुरवठा करणार असा उल्लेख केला होता. त्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी. मंजूर आराखड्यानुसार इमारतीचे बांधकाम करावे. बदल करताना सभासदांची परवानगी घ्यावी, यासह अनेक समस्या सातत्याने सोसायटी धारक महापालिका प्रशासनाकडे मांडत आहेत. मात्र त्यांच्या या मागण्यांना प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता.

हेही वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

शहरातील हाऊसिंग सोसायट्यांच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर सोसायटी फेडरेशनकडून आमदार महेश लांडगे यांना आपल्या मागण्याांबाबत सविस्तर माहिती दिली. आमदार लांडगे यांनी नुकतीच आयुक्त शेखर सिंग यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत भेट घेऊन त्यांना समस्या निवारणासाठी सारथी प्रणालीमध्ये वेगळी सोय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी सारथी प्रणालीमध्ये सोसायट्यांना स्वतंत्र ऍक्सेस देऊ केला आहे. त्याद्वारे सोसायटीधारक त्यांना भेडसावणार्‍या समस्या थेटपणे सारथी प्रणालीमध्ये दाखल करू शकणार आहेत. वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत त्याचे निराकरण केले जाणार आहे.

सोसायटीधारकांचे हेलपाटे टळणार..

सोसायटीधारकांना त्यांच्या मागण्यांसाठी सातत्याने अर्ज निवेदने घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि विनाकारण हेलपाटा होत असे. इतर तक्रारींप्रमाणे सारथीवर सोसायटीच्या समस्यांसाठी स्वतंत्र सुविधा दिल्याने नागरिकांची या त्रासातून सुटका झाली आहे. सारथीवर तक्रारी केल्याने महापालिका प्रशासनापुढे थेट प्रश्न पोचविण्यात येणार आहे. परिणामी आपले प्रश्न मार्गी लागणार असल्याने सोसायटीधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने दखल घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सारथीवर तक्रारी करण्याची सुविधा देणे गरजेचे असल्याची मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात येत होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. या बाबत आमदार महेश लांडगे यांच्याकडे गार्‍हाणे मांडले. त्यांनी सोसायटी धारकांसोबत बैठक घेतली. महापालिकेकडे पाठपुरावा केला. आयुक्तांना सूचना देत स्वतंत्र एक्सिस देण्याची मागणी केली होती. त्यानुसार ती सुविधा मिळाली आहे.

संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-चर्‍होली पिंपरी -चिंचवड- हाउसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button