TOP Newsदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

महापालिकेत शुकशुकाट : कामगारांच्या संपामुळे कामकाज यंत्रणा कोलमडली!

  • संपाचा आजचा दुसरा दिवस : जुनी पेन्शन योजनासाठी काम बंद आंदोलन

पिंपरी । विकास चौधरी

जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कर्मचारी समन्वय समितीमार्फत मंगळवार, दि. १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले अहाेत. या संपात सुमारे ६८ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.

सरकारी कार्मचारी काम बंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच सरकारी कर्मचारी संघटनांनी मंगळवारी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी मिळुन काल पिंपरी चिंचवड महापालिके समोर काम बंद आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या परिसरात कामगारांचा एकच जय गोश पाह्याला मिळत होता. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. वर्ग ३ पासून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे कार्यालये ओस पडली होती. आणि आज देखील पिंपरी चिंचवड महापालिका कामगारांन विना ओस पडली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात विविध संघटनांनी चर्चा, निवेदने दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी-शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर ठाम राहत असून, मागण्या मान्य हाेइपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, अशी माहिती कर्मचारी यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button