breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांचे अजित पवारांवर शरसंधान…

मुंबईः शिंदे गटाचे आमदार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केली आहे. आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो. त्यांच्यासारखी बुद्धी कुणाचीही चालत नाही, असं विधान गुलाबराव पाटलांनी केलं आहे. ते जळगाव येथे एका विवाह सोहळ्यात बोलत होते. या लग्नातील नवरी मुलगी पवार कुटुंबातील होती. त्यावरून गुलाबराव पाटलांनी शाब्दिक टोलेबाजी केली.

लग्नाच्या कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “नवरी मुलगी पवार कुटुंबातून येते. त्यामुळे आम्ही पवारांना घाबरुनच आहोत. तुम्ही सकाळी-सकाळी शपथ घेऊन टाकता आणि काहीही करून टाकता. आम्हाला काही कळू देत नाही. आम्ही पवारांना नेहमी घाबरुन असतो. त्यामुळे पवारांना कायम बरोबर ठेवावं लागतं. कारण पवारांची जी बुद्धी चालते, तेवढी कुणाचीच चालत नाही.”

“राजकारणाचा आणि विरोधाचा भाग सोडा पण हा लग्न सोहळा आहे. हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. व्यक्तीच्या घरातला कार्यक्रम आहे. माणुसकीतला हा सोहळा आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना खूप खूप आशीर्वाद देतो,” असं मनोगत गुलाबराव पाटलांनी यावेळी व्यक्त केलं. गुलाबराव पाटलांच्या या टोलेबाजीचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button