breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Breaking News : उपमहापौर दालनात तीन पाकिटचोरांची हातसफाई; दोघांच्या मुसक्या आवळल्या!

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील धक्कादायक प्रकार

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील उपमहापौर दालनामध्ये शुक्रवारी तीन पाकिटचोरांनी हातसफाई केली. सुमारे ४० हजार रुपयांचा ऐवज संबंधितांनी लंपास केला. मात्र, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने तीघांपैकी दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी होती. त्यानिमित्ताने महापालिका भवनात कार्यकर्ते, पदाधिकारी यांची मोठी गर्दी होती. त्याचा फायदा घेत पाकिटचोरांनी महापालिका भवनात प्रवेश केला. एवढेच नाही, तर विविध नागरिकांचे खिसे कापून सुमारे ४० हजारांचा ऐवज लंपास केला.

यावेळी घोळवे यांना शुभेच्छा देण्यासाठी आळंदीतील महाराज आले होते. त्यांच्या खिशावरही चोरट्यांनी डल्ला मारला. यावेळी एका कार्यकर्त्याच्या खिशात हात घालताना एका व्यक्तीने या दोघा चोरट्यांना रंगेहाथ पकडले. मात्र, काही सूज्ञ नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संत तुकारामनगर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत, तर एकजण गायब झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे महापालिका भवनामध्ये एकच खळबळ उडाली आहे. तसेच नवनिर्वाचित उपमहापौर केशव घोळवे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र होवू शकला नाही. याबाबत अद्याप कोणीही पोलिसांत तक्रार दिलेली नाही. या संशयित आरोपींकडे काहीही सापडलेले नाही. त्यामुळे पोलिसांनी या मुलांना पोलीस ठाण्यातच ठेवले आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button