पिंपरी / चिंचवड

सॅलिसबरी पार्कच्या मुद्द्यावरून पालिका आयुक्तांनी केली सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमसोबत चर्चा

पुणे l प्रतिनिधी

पुणे येथील सॅलिसबरी पार्क ला स्थानिक भाजप नगरसेवकाच्या वडिलांचे नाव देण्यात आले आहे. त्याला नागरिकांनी विरोध केला आहे. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. या प्रकरणी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमच्या सदस्यांसोबत सोमवारी (दि. 25) चर्चा केली. तसेच या प्रकारणाची चौकशी करून योग्य निर्णय देण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिले.

सोमवारी (दि. 25) दुपारी पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमच्या सदस्यांसोबत पालिकेतील दालनात चर्चा केली. यावेळी सॅलिसबरी पार्क रेसिडेंट्स फोरमचे अध्यक्ष फैझल पुनावाला, गोपेश मेहता, विनिता देशमुख, बाळासाहेब रुणवाल, शेनाझ चावला आदि उपस्थित होते.

पालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, “सॅलिसबरी पार्कला लावण्यात आलेला नामकरण फलक बेकायदेशीर असेल तर तीन ते चार दिवसात तो खाली उतरवण्यात येईल. पुणे महापालिकेच्या लीगल डिपार्टमेंटशी बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल. सन 2000 साली काढण्यात आलेल्या आदेशातील तरतुदी देखील लक्षात घेतल्या जातील.

72 वर्षांचे गोपेश मेहता हे सॅलिसबरी पार्कसाठी पहिल्या दिवसापासून संघर्ष करीत आहेत. त्यांचा हा संघर्ष 40 वर्षांपासून सुरु आहे. याबाबत आयुक्त विक्रम कुमार यांनी गोपेश मेहता यांचे कौतुक केले. ‘तुमच्या सारख्या सजग लोकांमुळे हे गार्डन उपलब्ध झाले, याचे मला खूप कौतुक आहे’ असे गौरवोद्गार आयुक्तांनी काढले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button