breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची ‘स्वॅब तपासणी’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभवानंतरही मतदार संघात फिरता दौरा असतो. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे तसेच प्रशासकीय कामकाजातील त्रुटी तपासण्याचे काम ते करतात. दरम्यान, लोकांशी संपर्क आल्याने आज त्यांच्या एका सुरक्षारक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यावर त्यांनी त्यांच्यासोबतच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.

कोरोनामुळे पहिल्यांदा लॉकडाऊन झाला. तेव्हा साडेतीन महिने स्वत:चा फिटनेस संभाळून कोरोनाच्या प्रभावकाळात व प्रभाव क्षेत्रात आढळराव पाटील मतदार संघातील बहुतेक गावांमध्ये फिरत होते. दरम्यान, लोकांशी संपर्क आल्याने आज त्यांच्या एका सुरक्षा रक्षकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले. याबाबत शिवसेनेच्या काही मोजक्या पदाधिका-यांना ही माहिती होती. त्यानंतर आढळराव पाटील यांचे फोन खणखणू लागले. या माहितीला त्यांच्या कार्यालयानेही दुजोरा दिला असून, संबधित सुरक्षा रक्षकाचे संपर्कातील सर्वांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी पाठविण्याच्या सुचना स्वत: आढळराव यांनी आपल्या कार्यलयाला दिल्या. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आढळराव यांना आता त्यांचा स्वॅब अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत फिरता येणार नाही, हे नक्की.

माझ्या सुरक्षा रक्षकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र, त्याच्या ड्यूटीमुळे त्याचा माझा थेटपणे संपर्क खूप कमी आलेला आहे. मी व माझ्या जवळच्या बहुतेकांनी एन-१९ मास्क वापरण्याबरोबरच आवश्यक त्या सर्व दक्षता घेतलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारची लक्षणेही मला व माझ्या जवळच्या स्नेह्यांना सध्या तरी दिसत नाहीत. तरीही मी व संपर्क शक्यता असलेल्यांचे स्वॅब मी स्वत:हून देत असून, आम्हा सर्वांच्या अहवालाची मला प्रतिक्षा आहे.

 – शिवाजीराव आढळराव पाटीलमाजी खासदार, शिरूर

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button