युटयूबर रणवीर अलाहबादिया प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी
‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील टिप्पणी

मुंबई : ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आई-वडिलांवर अश्लील टिप्पणी केल्या प्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये रणवीर विरोधात FIR दाखल करण्यात आले आहेत. हे एफआयआर रद्द करण्यासाठी रणवीरने उच्च न्यायालयाचा दरवाजा थोटावला . पण उच्च न्यायालयात देखील त्याच्या पदरी निराशी आली आहे. मंगळवारी या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. त्यावेळी न्यायाधीशांनी रणवीरला चांगलेच फटकराले आहे. त्यांनी थेट ‘ही अश्लीलता नाही तर काय आहे?’ असा सवाल केला आहे.
रणवीर अलाहबादिया विरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यांनी केवळ रणवीरच्या शोवर बंदी घातली नसून त्याचा पासपोर्ट देखील जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाची परवानगी घेतल्याशिवाय रणवीरला देशाबाहेर जाण्याची परवानगी नसल्याचे सांगितले. चला जाणून घेऊया रणवीर अलाहबादिया प्रकरणात कोर्टाने कोणती १० मोठी विधाने केली…
हेही वाचा : पेट्रोल ऐवजी नुसते पाणीच! शहरातील पंपावरील धक्कादायक प्रकार
-ही अश्लीलता नाही तर काय आहे? तुम्ही नेमकं कोणत्या भाषेचा वापर करत आहात? तुम्हाला सर्व प्रकारच्या गोष्टींबद्दल बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळाले?
-लोकप्रिय असण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही विधान कराल. तुम्ही लोकांच्या आई-वडिलांचा अपमान करत आहात. असे वाटत आहे तुमच्या डोक्यात काही तरी घाण भरली आहे.
-तुम्ही ज्या शब्दांचा वापर केलाल आहे त्यामुळे आई-वडिल आणि बहिणींना लाज वाटत आहे. संपूर्ण समाजाला लाज वाटत आहे. ही विकृत मानसिकता आहे. तुमच्या संपूर्ण टीमने विकृती दाखवली आहे.
-जर तुम्ही अशा प्रकारची विधाने करून लोकप्रियता मिळवत असाल तर इतर लोक देखील अशीच लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करतील.
– हे अतिशय निंदनीय वर्तन आहे. तुम्ही समाजाला गृहीत धरत आहात. आम्हाला या जगातील एक व्यक्ती सांगा ज्याला हे आवडले आहे.
-तुम्हाला आतापर्यंत मिळालेल्या धमक्यांचा प्रश्न जिथे येतो तिथे कायदा काम करेल. राज्य सरकार धमकी देणाऱ्यांवर कारवाई करेल. आपल्याकडे कायद्याचे पालन करणारी न्याय व्यवस्था आहे.
-रणवीरला चौकशीसाठी बोलावण्यात येईल. त्यासाठी त्याला हजर रहावे लागेल.
– रणवीरला मिळालेल्या धमक्यांवर सुप्रीम कोर्ट म्हणाले की ज्या धमक्या देण्यात आल्या आहेत त्यामधील भाषा ही तुमच्यापेक्षा नक्कीच चांगली आहे. किमान कोणालाही वाचल्यावर लाज वाटणार नाही.