TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

रस्ते अपघातांत तरुण चालकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक

मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षांत रस्ते अपघातांत जीव गमावलेल्या वाहनचालकांपैकी सरासरी २५ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींची संख्या अधिक असल्याचे महामार्ग पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. कमावत्या वयातील चालकांच्या मृत्यूचे हे प्रमाण ५७ टक्के आहे.

यंदा जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या २४,३६० अपघातांत ११,१४९ चालकांचा मृत्यू झाला. त्यांत कोणत्या वयोगटातील किती चालकांचा मृत्यू झाला याचा तपशील यथावकाश जाहीर होणार असला तरी त्यातही कमावत्या वयातील व्यक्तींची संख्या अधिक असू शकते, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

कर्त्यां व्यक्तींचा मृत्यू..

अपघातांतील मृतांच्या आकडय़ांवर कटाक्ष टाकला तर तरुण चालकांचे प्रमाण मोठे आहे. अपघातात प्राण गमावलेला हा चालक वर्ग २५ ते ४५ वयोगटातील आहे, असे महामार्ग वाहतूक पोलिसांनी जाहीर केलेल्या आकडेवारीतून अधोरेखित होते. 

कारणे काय? वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेदरकारपणा, वेगाची नशा ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघातांची संख्या वाढते. करोना साथीच्या काळात अनेक तरुणांना वाहन चालविण्याची मौज लुटता आली नाही, मात्र निर्बंध मागे घेताच तरुण चालकांनी वेगाची हौस भागवण्याच्या नादात आपले प्राण गमावले.

नव्या वाहनांना अधिक अपघात 

गेल्यावर्षी अपघातग्रस्त झालेल्या वाहनांच्या संख्येत सर्वाधिक नवी आणि पाच वर्षांपेक्षा कमी वयाची वाहने आहेत. त्यांची संख्या ४,९४९ आहे. या वाहनांच्या अपघातात ५,३५१ जणांचा मृत्यू झाला, तर अपघातग्रस्त झालेल्या ५ ते १० वर्षांच्या वाहनांची संख्या ३,८२६ असून त्यांत ४१४६ मृत्यू झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button