Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत-चिली व्यापार कराराच्या बोलणीत प्रगती; ऑगस्टमध्ये दुसऱ्या टप्प्याची चर्चा

नवी दिल्ली : वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार दक्षिण अमेरिकेतील चिली आणि पेरूसोबत व्यापार कराराची पहिल्या टप्प्याची बोलण यशस्वी झाली असून दुसर्‍या टप्प्याची बोलणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहेत.

या दोन्ही देशांबरोबर वाणिज्य मंत्रालयाची दोन वेगळी शिष्टमंडळे चर्चा करीत आहेत. चिली देशाबरोबर दोन टप्प्यात चर्चा समाप्त झाली आहे. तर पेरू देशाबरोबरील चर्चेचा आठवा भाग ऑगस्टमध्ये होणार आहे. चिली आणि पेरू सोबत भारताने 2006 मध्ये अंतरिम स्वरूपाचा व्यापार करार केला असून या कराराची अंमलबजावणी यशस्वीरित्या चालू आहे.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा ! राज्यात ‘मुस्कान’नंतर ‘शोध मोहीम

आता या दोन्ही देशाबरोबर सर्वसमावेशक मुक्त व्यापार कराराची बोलणी चालू आहे आणि ही बोलणी समाधानकारक पद्धतीने चालू असल्याचे वाणिज्य मंत्रालयाने या संदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे.

डिजिटल क्षेत्रातील उत्पादने, लघु उद्योगांची उत्पादने आणि रेअर अर्थ मेटल संदर्भात या दोन्ही देशाबरोबर व्यापक स्वरूपाची बोलणी चालू असल्याचे सांगण्यात आले. भारत चीलीकडून खनिजे आयात करतो तर भारत चीलीला औषधी आणि वाहनाचे सुटे भाग पुरवितो.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button