Breaking-newsउद्योग विश्व । व्यापारमहाराष्ट्रमुंबई

सर्वसामान्यांना धक्का! सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर

Gas Price Increase : होळी आणि ईदपूर्वी सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ जाहीर केली आहे. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत १ मार्च २०२५ पासून म्हणजेच आजपासून वाढवण्यात आली आहे. इंडियन ऑइलने १ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत ६ रुपयांची वाढ केली आहे, त्यामुळे दिल्लीत या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपयावर पोहोचली आहे.

सरकारी कंपन्यांकडून दर महिन्याच्या पहिल्या दिवशी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. त्यानुसार आजपासून नवीन महिना सुरू होतो आहे. त्यामुळे या कंपन्यांनी आजपासून नव्या किंमती लागू केल्या आहेत. मात्र, हा सणासुदीचा महिना आहे. याच महिन्यात होळी आणि ईद हे सण आहेत. उद्यापासून रमजानचा महिना सुरु होतो आहे. याशिवाय अनेक लग्नकार्यही या महिन्यात पार पाडणार आहेत.

हेही वाचा –  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा जाणून घ्या, ७३३ कोटी रुपयांची मदत कुणाला मिळणार

पण सणासुदीच्या काळातच कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती वाढण्याचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत सहा रुपयांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर रेस्टॉरंटमध्ये जेवण किंवा इतर पदार्थ महाग होण्याची शक्यता आहे.

नव्या दरानुसार दिल्लीत दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १७९७ रुपयांवरून १८०३ रुपये करण्यात आली आहे. तर कोलकातामध्ये या सिलिंडरची १९०७ रुपयांवरून १९१३ रुपये झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर १७४९.५० रुपयांवरून १७५५.५० रुपयांवर पोहोचले आहेत. तर चेन्नईमध्ये, व्यावसायिक सिलिंडरचे दर १९५९ रुपयांवरून १९६५ रुपयांवर पोहोचले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ही दरवाढ केवळ व्यावसायिक सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत कोणताही वाढ करण्यात येत नसल्याचं कंपन्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button