TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील अनेक भागांत मंगळवारी पाणीकपात

मुंबई : जलवाहिनीची दुरुस्ती आणि अन्य कामांमुळे मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून ३० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईतील १२ विभागांतील पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील ३०० मिलीमीटर व्यासाच्या बाह्यवळण जलवाहिनीतून होणाऱ्या गळतीच्या दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय एक आणि दोनसाठी १८०० मिलीमीटर व्यासाच्या नवीन वाहिनीचे जोडकाम मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजतापासून बुधवारी ३० नोव्हेंबर सकाळी साडेआठ वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे.

या कालावधीत वांद्रे ते गोरेगाव, भांडुप, कुर्ला, विद्याविहार या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. तर, अंधेरी, विलेपार्ले पश्चिम विभागातील परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित  राहील. अंधेरी पूर्व, दादर , माहीम, गोरेगाव  विभागांतील काही परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button