क्रिडाताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या गोकर्णाचा अभिमानास्पद ‘सुवर्णयोग’!

पहिल्याच विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धेत दुहेरी सुवर्ण, भारताचे नाव उज्ज्वल

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी

अहमदाबाद येथे पार पडलेल्या पहिली विश्व योगासन अजिंक्यपद स्पर्धा मध्ये पिंपरी-चिंचवडचा युवा योगपटू गोकर्णा शर्मा याने भारताचे प्रतिनिधित्व करत दैदिप्यमान कामगिरी केली. सब-ज्युनिअर मुलांच्या गटात गोकर्णाने बॅक बेंडिंग वैयक्तिक प्रकार तसेच पारंपरिक सांघिक प्रकार या दोन प्रकारांमध्ये सुवर्णपदके पटकावत भारताला दुहेरी यश मिळवून दिले.

जगभरातील अनेक देशांतील उत्कृष्ट योगपटूंनी सहभाग घेतलेल्या या ऐतिहासिक स्पर्धेत गोकर्णाने आपली विलक्षण लवचिकता, अचूक संतुलन, ताकद आणि तांत्रिक योगकौशल्य यांचे प्रभावी सादरीकरण केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय मंचावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला.

हेही वाचा

३ लाख ६२ हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी घेतला विविध सवलतींचा लाभ

वाकड येथील विज्डम वर्ल्ड स्कूल चा विद्यार्थी असलेला गोकर्णा सध्या दृष्टी योग अकादमी येथे नियमित प्रशिक्षण घेत आहे. योग प्रशिक्षक सिद्धार्थ शिंदे आणि शरयू नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण सराव, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि कठोर मेहनतीच्या जोरावर त्याने हे अभूतपूर्व यश संपादन केले.

पहिल्याच विश्व योगासन स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकण्याची गोकर्णाची कामगिरी केवळ वैयक्तिक यशापुरती मर्यादित नसून ती देशातील युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. योगासन हा खेळ जागतिक स्तरावर वेगाने विस्तारत असताना, गोकर्णासारख्या प्रतिभावान खेळाडूंची कामगिरी भारताच्या योगपरंपरेला नवी ओळख मिळवून देणारी आहे.

गोकर्णाच्या या यशामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण महाराष्ट्राच्या योगक्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी क्रीडाप्रेमी, शिक्षक, प्रशिक्षक आणि नागरिकांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button