Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा सातारा दौरा अचानक रद्द, पुन्हा हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, नेत्यांच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

Pankaja Munde : मंत्री पंकजा मुंडे यांचा सातारा दौरा अचानक रद्द झाला आहे. तांत्रिक कारणास्तव हेलिकॉप्टर उड्डाण रद्द झाल्याची माहिती मिळाली आहे. आज दुपारी मुंडे या मुंबईतून साताऱ्याला जाणार होत्या. मात्र, हेलिकॉप्टर रद्द झाल्याने दौरा ही रद्द करावा लागला आहे. याआधी पंकजा मुंडे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. आजही त्यांचा दौरा रद्द झाला असून, पंकजा मुंडे या दौरा रद्द करून रस्ते मार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये पुन्हा बिघाड झाल्याने नेत्यांच्या हवाई सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी देखील भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडें यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली होती. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्यापूर्वीच बिघाड झाल्याचे निष्पन्न झाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंडे लातूर दौऱ्यावर जाणार होत्या, मात्र टेकऑफपूर्वीच हेलिकॉप्टरच्या पायलटला तांत्रिक बिघाड असल्याचे निष्पन्न झालं. परिणामी पंकजा मुंडेंनी आपला प्रवास आणि संभाव्य सभांच्या वेळा पुढे ढकलल्या असल्याची माहिती आहे.

हेही वाचा –  हप्ते रखडलेल्या लाडक्या बहिणींना एकत्रित 4500 रुपये मिळणार; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

दरम्यान, या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली होती. मी सकाळी साडे दहा वाजता निघणार होते. त्यासाठी हेलिकॉप्टर विमानतळावरून टेक ऑफ होणार होते. मात्र मला कळवण्यात आले मी जे काल हेलिकॉप्टर वापरत होते त्यामध्ये काही बिघाड आहे. मला कालही तसे वाटले होते, हे हेलिकॉप्टर जुने आहे. पण काय बिघाड आहे या टेक्निकल बाबतीत मी गेले नाही. मला दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात येणार असे सांगण्यात आले. मात्र जेव्हापासून अजितदादांचा अपघात झाला आहे आणि त्यात त्यांचे निधन झाले आहे. मी विचार करते की त्यावेळी त्या विमानातील लोकांना काय वाटले असेल? किती भयानक यातना आणि भय त्यांनी अनुभवले असेल. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडें यांनी दिलीय.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button