“सरकारने देशाचा माहौल बिघडवला” ; मशिदी झाकण्यात आल्याने संजय राऊतांची सरकारवर टीका

Sanjay Raut : यंदा होळीचा सण शुक्रवारी आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या वादात मुस्लिमांनी शुक्रवारची नमाज अदा काण्याची वेळ काही ठिकाणी बदलण्यात आली तर काही ठिकाणी मशिदींना कापडाने झाकण्यात आले. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
देशातील सध्याच्या धार्मिक उन्मादावर खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली. देशात होळीला मशिदी झाकून ठेवण्याची, त्यावर अच्छादन टाकण्याची वेळ आल्याने हा संकुचितपणा देशाला आणि धर्माला परवडणारा नसल्याची चपराक सुद्धा त्यांनी लगावली. त्यासोबतच त्यांनी राजकीय धुळवडीवर सुद्धा भाष्य केले.
आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी देशाचा माहौल बिघडल्याचा गंभीर आरोप सरकारवर केला. आम्ही कोणालाही विरोधक समजत नाही. नक्कीच आज होळी आहे. रंगपंचमी आहे एक महत्त्वाचा सण आहे. अनेक वर्ष हा सण सगळे एकत्र येऊन आम्ही साजरा करतो. आता काल दिल्लीत होतो दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, वाजपेयी असे प्रमुख नेते त्यांच्या घरी होळी व्हायची आणि सर्व राजकीय पक्षाचे आणि धर्माचे लोक त्या होळीमध्ये सहभागी होत असत. पण गेल्या काळी काळापासून ही प्रथा बंद झाली, अशी खंत संजय राऊत यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – ‘₹’ चिन्ह बदलने म्हणजे ‘अलिप्ततावादी भावने’चे संकेत
पुढे बोलताना त्यांनी,”आम्ही फार संकुचित होत आहोत आणि हा संकुचित पणा या देशाला आणि आपल्या समाजाला आले हिंदू धर्मालाही परवडणारा नाही आमची प्रतिमा जगभरात लिबरल सहिष्णू अशी आहे, म्हणून हिंदू धर्माला जगामध्ये मान आहे. आमच्या धर्माचा रक्षण करून आम्ही आमच्या सांस्कृतिक सर्वांना सामावून घेतो दुर्दैवाने गेल्या दहा वर्षात मोकळेपणा आमच्या संस्कृतीला संपला नष्ट केला आणि आपण दिवसेंदिवस अधिक संकुचित आणि धर्मांध होण्यासाठी विशिष्ट गट आपल्याला प्रवृत्त करतो, असा घणाघात संजय राऊत यांनी घातला.
त्यासोबतच त्यांनी “होळी हा सर्वांनी एकत्र येऊन रंग उधळण्याचा सुख दु:खामध्ये एकत्र येण्याचा सण आहे उत्सव आहे आज देशांमध्ये काय चालू आहे महाराष्ट्रात काय चालू आहे कुठे मशिदीवरती झाकून ठेवण्याची वेळ येते कुठे होळी एका बाजूला आणि नमाज दुसर्या बाजूला ठीक आहे हे सुद्धा दिवस निघून जातील,” असा आशावाद त्यांनी मांडला.