माथेरानच्या १० नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार! जिल्हाधिकाऱ्यांची नोटिस
रायगड- भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवसेनेच्या १० नगरसेवकांना रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. यावर ३० जूनला सुनावणी होणार आहे.
माथेरान नगरपालिकेतील शिवसेनेच्या १४ पैकी १० नगरसेवकांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच्या विरोधात या नगरसेवकांवर विरुद्ध कारवाईची मागणी शिवसेनेचे अनिल देसाई आणि गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानुसार रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या १० नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. त्यानुसार त्यांच्यावर जिल्हाधिकारी अपात्रतेसारखी कारवाई करू शकतात. यावर ३० जूनला पुढील सुनावणी होणार आहे. माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. ते सर्व शिवसेनेचे होते. परंतु त्यातील १० नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे तेथील शिवसेनेची सत्ता गेली आणि भाजपची सत्ता आली. मात्र आता यावर जिल्हाधिकारी निर्णय देणार आहेत.





