Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#RainAlert: मुंबई, गोवा, सिंधुदुर्ग भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता- हवामान विभाग
मुंबई: महाराष्ट्रासह मुंबईत ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून आज काहीशी पावसाने विश्रांती घेतली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईजवळील कल्याण भागात तसेच गोवा (Goa), सिंधुदुर्ग आणि दक्षिण घाट भागात ढग दाटून आल्याने पावसाची धुसर शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
तसेच हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापर्यंत मुंबईतील पावसाचा जोर कमी होऊन नाहीसा होईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, 28 सप्टेंबर पासून देशात परतीच्या पावसाला सुरुवात असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा यासह परतीचा पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळेच नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.





