ताज्या घडामोडीमुंबई

#Megablockupdate : लोकल आज उशिराने धावणार, मेगाब्लॉक कुठे आणि कधी?

मुंबई | प्रतिनिधी

ठाणे-कल्याण दरम्यान आज, रविवारी दिवसा १२ तासांचा आणि ठाणे ते वाशी व बोरिवली ते अंधेरी दरम्यान शनिवार-रविवार मध्यरात्री मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर मात्र कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक कालावधीत लोकल विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

स्थानक – ठाणे ते कल्याण

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ – सकाळी ९ ते रात्री ९

परिणाम – ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही लोकल विलंबाने धावणार आहेत.

ट्रान्सहार्बर

स्थानक – ठाणे ते वाशी

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – शनिवार रात्री ११.४५ ते रविवार पहाटे ०५.४५ वाजेपर्यंत

परिणाम – ठाणे आणि ऐरोली स्थानकांदरम्यान भुयारी मार्गासाठी गर्डर्स आणि बॉक्स टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक – बोरिवली ते अंधेरी

मार्ग – अप आणि डाऊन जलद

वेळ – शनिवार रात्री ११.४५ ते रविवारी पहाटे ४.४५

परिणाम – ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button