Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडी

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ३ रुपयांची मोठी दरवाढ

Petrol Diesel Price | गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांनी आता उच्चांक गाठला असून सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ-उतारामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सुमारे ३ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलने पुन्हा एकदा १०६ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

पेट्रोलच्या दरात झालेली ही वाढ वाहनधारकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे नवे दर प्रति लिटर मुंबईत १०६.६८ रुपये (३.१४ रुपयांची वाढ), दिल्लीत ९७.७७ रुपये (३.०० रुपयांची वाढ), कोलकात्यात १०८.७४ रुपये (३.२९ रुपयांची वाढ) आणि चेन्नईमध्ये १०३.६७ रुपये (२.८३ रुपयांची वाढ) इतके झाले आहेत.

हेही वाचा

NEET परीक्षेचा संभ्रम मिटला! रद्द झालेली पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार

पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरातही मोठी वाढ झाल्यामुळे केवळ खासगी वाहनचालकच नव्हे, तर मालवाहतूक क्षेत्रावरही याचा मोठा परिणाम होणार आहे. डिझेल महागल्यामुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून, पर्यायाने बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सार्वजनिक वाहतूक आणि खाजगी प्रवासासाठी आता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

या दरवाढीनंतर देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे नवे दर प्रति लिटर मुंबईत ९३.१४ रुपये (३.११ रुपयांची वाढ), दिल्लीत ९०.६७ रुपये (३.०० रुपयांची वाढ), कोलकात्यात ९५.१३ रुपये (३.११ रुपयांची वाढ) आणि चेन्नईमध्ये ९५.२५ रुपये (२.८६ रुपयांची वाढ) असे झाले आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ऐन महागाईच्या काळात सर्वसामान्यांचे घरगुती बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button