Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

NEET परीक्षेचा संभ्रम मिटला! रद्द झालेली पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार

NEET PG Re-exam | पेपरफुटीच्या प्रकरणामुळे केंद्र सरकारच्या निर्देशानंतर रद्द करण्यात आलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिलेल्या माहितीनुसार, ही पुनर्परीक्षा येत्या २१ जून रोजी रविवारी देशभरात पार पडणार आहे. परीक्षेची तारीख समोर आल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संभ्रमात असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचे नियोजन करणे शक्य होणार आहे.

देशभरात ३ मे रोजी २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर विद्यार्थी आणि पालक तणावमुक्त झाले होते. मात्र, काही दिवसांतच व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि विविध प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून या परीक्षेचे पेपर हजारो रुपयांना विकले गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले. या पेपरफुटीच्या धक्कादायक प्रकारानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संपूर्ण परीक्षाच रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला होता, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ६ जणांना अटक केली आहे.

हेही वाचा

उष्णतेच्या तीव्र लाटेचा हवामान विभागाचा इशारा

NTA नं पुनर्परीक्षेसाठीची नियमावली जारी

दरम्यान, NEET ची पुनर्परीक्षा २१ जूनला होणार असल्याचं जरी एनटीएनं आज जाहीर केलं असलं, तरी या पुनर्परीक्षेची नियमावली मात्र परीक्षा रद्द केली त्याच दिवशी एनटीएकडून जाहीर करण्यात आली होती.

१. ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी आधीच नोंदणी केली होती, त्यांचा डेटा आणि उमेदवारी फेरपरीक्षेसाठी जशीच्या तशी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

२. विद्यार्थ्यांनी मे महिन्यातील परीक्षेसाठी जी केंद्रे निवडली होती, तीच केंद्रे फेरपरीक्षेसाठी कायम ठेवली जाणार आहेत. केंद्रांच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

३. फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क पूर्णपणे परत (Refund) केले जाणार आहे.

४. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अनधिकृत बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन NTA ने विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button