ताज्या घडामोडीमुंबई

महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये?

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व

मुंबई : हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि आशिर्वाद घेतला जातो. मान्यतेनुसार, महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा पार पडला होता. अनेक भक्त महाशिवरात्रीचे व्रत आणि पूजा करतात. महाशिवरात्रीची पूजा केल्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी दोन प्रकारचे व्रत केले जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला व्रत किंवा फळांचे व्रत केले जाते. या दिवशी महादेवाच्या पिंडीची पूजा केली जाते. महाशिरात्रीची पूजा प्रसन्न आणि सकारात्मक मनानी केली पाहिजेल.

महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या कामांना यश मिळण्यास मदत होते. महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला उपवास केल्यामुळे तुम्हाला महादेव आणि माता पार्वतीचा आशिर्वाद मिळण्यास मदत होते. निर्जला व्रत म्हणजे पाणी किंवा अन्न न घेता संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास केला जातो. अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय खाल्लं पाहिजेल असा प्रश्न सर्वांना पडतो.

हेही वाचा –  ‘पुणेकरांना मुळशी धरणातून पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव विचाराधीन असून त्यावर लवकरच मार्ग निघेल’; मंत्री चंद्रकांत पाटील

हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच 26 फेब्रुवारी बुधवारी सकाळी 11:08 वाजल्यापासून 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 वाजेपर्यंत असणार आहे. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते, म्हणून महाशिवरात्रीचे व्रत 26 फेब्रुवारी रोजी केली जाणार. महाशिवरात्रीच्या उपवासात विविध प्रकारची फळे खाऊ शकतात. तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा, चेस्टनटच्या पिठापासून बनवलेली रोटी किंवा पराठा, मखाना खीर किंवा भाजलेला मखाना, दूध, दही आणि चीज, सुका मेवा खाऊ शकता. महाशिवरात्रीच्या उपवासात धान्ये म्हणजेच गहू, तांदूळ आणि इतर धान्ये खाऊ नयेत. कांदा, लसूण, मुळा, वांगी, मांस, मासे किंवा तामसिक पदार्थाचे सेवन करू नये.

असे केल्याने तुम्हाला उपवासाचे पूर्ण फायदे
महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून महादेवाच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करा. या वेळी “ॐ नमो नमः शिवाय” या मंत्राचा जप करत रहा. यानंतर, संध्याकाळी फळांनी उपवास सोडा. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी, सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी केल्यानंतर, भगवान शिवाची योग्य पद्धतीने पूजा करा आणि त्यांचा गंगाजलने अभिषेक करा. शिवरात्रीच्या उपवासाच्या वेळी फक्त सात्विक अन्नच सेवन करावे हे लक्षात ठेवा. या दिवशी ब्राह्मणांनाही दान द्यावे. असे केल्याने तुम्हाला महाशिवरात्रीच्या उपवासाचे पूर्ण फायदे मिळतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button