खंडोबाच्या कऱ्हानदीवर कचरामुक्त नदी सफाई अभियान
ज्ञानयोगासेवा ट्रस्टचा कृती संकल्प
जेजुरी : महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरी खंडोबा देवाच्या पवित्र कऱ्हा नदीला प्रदूषणाचा विळखा असून निर्मलाय कचरा मुक्त करण्याकरिता हडपसर येथील ज्ञानयोग सेवा ट्रस्ट, रुद्रतेज वाद्य प्रतिष्ठान, आणि नगरपालिका सहकार्यतून आणि मार्तंड देवसंस्थान चे विश्वस्त डॉ राजेंद्र खेडेकर आणि ज्ञानयोग सेवा ट्रस्ट संस्थापिका मनीषाताई खेडेकर यांच्या पुढाकारातून कऱ्हामाई कचरा मुक्त अभियान राबवित नदीची साफसफाई करीत किनारा स्वच्छ करण्यात आला.
या स्वच्छता मोहिमेत रुद्रतेज वाद्य पथक सयोंजक अमित गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते राहुल निकम, प्रसाद मर्गम, माऊली कुडले, सुनील माळी, कपिल गायकवाड , सिद्धार्थ सरोदे , समीर मगर, सनी बारवकर , सिद्धांत शिंदे ,आशिष मगर, तम्मा कलशेट्टी, दिनेश भंडारी, ओंकार मांगडे, अनिल तिवारी,इत्यादीनी सहभाग दर्शवीला. दर रविवारी नदीकिनाऱ्यावर भविक मोठ्या श्रद्धापूर्वक या पापनाशक तीर्थ मानलेल्या नदीवर स्नान करण्यास येतात इतकेच काय तर सोमवाती अमावस्या यात्रेला लाखो भविक खंडोबा मूर्ती स्नान सोहळ्यास येऊन कऱ्हस्नान घेतात परंतु स्थानिक प्रशासनाचे, मंदिर व्यवस्थापनाचे स्वच्छते आणि दुरुस्ती व्यवस्थापन चा नेहमीच कांनाडोळा केला जात असतो.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
त्यातच गणेश विसर्जन काळातही कित्येक दिवस निर्मलाय, काचचफ़ोटो, तर चित्रविचित्र अवस्थेतील गणेश व इतर देवता मातीच्या मूर्ती, पूजेचे साहित्य कुजलेले साहित्य आणि श्रद्धा म्हणून टाकलेले नारळ याचे दिवसोंदिवस वाढते प्रमाण पाहता येथील एकमेव स्थानिक विश्वस्त यांनी पुढाकार घेत शनिवारी स्वछता मोहीम राबविली तर किनाऱ्यावर जंतूनाशक पावडर ही मारली यामुळे किनारा चकाचक करण्यात आला आहे. शासनाने कोट्यावधी रुपये जेजुरी मंदिर परिसर विकासा करिता दिला असूनही या पवित्र नदीवर अदयापही घाट उभारण्यात आला नाहीं ही स्थानिक देवसंस्थान कमिटीची उदासीनता म्हणावी लागेल.
एक विश्वस्त वगळता सर्वच विश्वस्त आपला डामडोल जाहिरात बाजी करण्यात व्यस्त असतात, यामुळे मंदिरात प्रसिद्धी करिता विश्वस्त मंडळाची चडाओढ कायम चालू असते देवसंस्थान विश्वस्त कमिटीचा गणेश विसर्जन काळात मिरवणुकीत विश्वस्तानी पारंपरिक वाद्ययांना फाटा देत डॉल्बी डीजे चा वापर केला आहे आळंदीच्या धरतीवर कऱ्हा नदीवर घाटाची उभारणी बाबत स्थानिक मानकरी ग्रामस्थ भक्त गुरव पुजारी वीर कोळी घडशी प्रयत्नशील असून मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आल्याचे खेडेकर यांनी सांगितले.





