Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर धडाका! अवघ्या ८ दिवसांत कमावले ६० कोटी

Raja Shivaji Movie | अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुखची महत्त्वाकांक्षी कलाकृती असलेल्या ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे नवे शिखर गाठले आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या ८ दिवसांत ६० कोटींचा टप्पा ओलांडून मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास जागतिक स्तरावर पोहोचवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून प्रत्येक दिवशी चित्रपटाच्या कमाईचे आकडे थक्क करणारे आहेत.

हेही वाचा

उद्यानात उभारण्यात येणारे विरंगुळा केंद्र सामाजिक संवादासाठी व्यासपीठ ठरेल; महापौर रवि लांडगे

अशी आहे ८ दिवसांची कमाई

चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची विक्रमी कमाई करून दमदार सुरुवात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ११.५० कोटी आणि तिसऱ्या दिवशी तब्बल १३.१० कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या तीन दिवसांनंतरही चित्रपटाचा वेग कायम राहिला. चौथ्या दिवशी ६.२० कोटी, पाचव्या दिवशी ५.४० कोटी, सहाव्या दिवशी ४.७० कोटी आणि सातव्या दिवशी ४.४० कोटी रुपयांचे कलेक्शन केले.

दुसऱ्या आठवड्यातही जबरदस्त पकड

दुसऱ्या शुक्रवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या आठव्या दिवशीही चित्रपटाने आपली पकड ढिली होऊ दिली नाही. आठव्या दिवशी चित्रपटाने ३.२० कोटींची कमाई केली आहे. यासह ‘राजा शिवाजी’चे आतापर्यंतचे एकूण कलेक्शन ६०.९० कोटी रुपये झाले आहे. अवघ्या आठ दिवसांत ६० कोटींचा आकडा पार केल्यामुळे हा चित्रपट येणाऱ्या काळात आणखी कोणते विक्रम प्रस्थापित करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button