ताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्रमुंबई

मर्दानी दसरा नियोजन बैठकीला गाव सारा जमा

मानकरी खान्देकरांचा ग्रुप विमा उतरवण्याचा निर्णय

जेजुरी : भारतीय लोकदैवत जेजुरीच्या लक्षवेधी मर्दानी दसरा उत्सवाच्या नियोजन बैठकीला जेजुरीकर ग्रामस्थ सारा ऐतिहासिक मल्हारराव राष्ट्रीय स्मृती छत्री मंदिर जमा झाला होता संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या मर्दानी दसरा परंपरा आणि सोयसुविधा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यात दरवर्षी प्रमाणे मर्दानी दसऱ्यात सामील होणाऱ्या मानकरी खान्देकरी सह खंडा बहाद्दर यांचा ग्रुप विमा उतरवण्या चे देवसंस्थान कमिटी अध्यक्षाने आश्वासन दिले आहे त्यास प्रति उत्तर म्हणून ग्रामस्थांनी ट्रस्ट ला जमत नसल्यास ग्रुप विमा उतरवण्याचा निर्णय या आयोजन बैठकीत घेण्यात आला. खर तर अठरा पगड जाती धर्माचे लोकदैवत असलेला खंडोबा देवाचा दसरा परंपरा आणि धार्मिक रितीरिवाजा नुसार दरवर्षी येथील ग्रामस्थ मानकरी गावकरी आणि मंदिर संस्कृती उपासक गुरव, वीर कोळी घडशी समाज शेकडो वर्षांपासून करीत आला आहे.

हेही वाचा  : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू

सदर दसरा लक्षवेधी असल्याने देशविदेशातून लोक हा मर्दानी दसरा पाहायला येत असतात या उत्सव सोहळ्यात रीती रिवाज नुसार मंदिर प्रदक्षणा नंतर गडाच्या भव्य दगडी प्रवेशद्वारातून पायरी मार्गांवरून वजनदार पालखी सिमोलंघन करिता नेण्यात खान्देकरी मानकऱ्यांची मर्दानी चढाओढ होत असते आजपर्यंत ही मर्दानी परंपरा आबादित ठेवण्याचे श्रद्धा भक्तीपूर्वक काम ग्रामस्थांनी ठेवले आहे इतकेच काय तर तीनशे वर्षांपूर्वीचा आणि 42किलो वजनाचा ऐतिहासिक महाखंडा चित्तथरारक कसरती द्वारा करून दखवण्याचे कोशल्य ही जेजुरीकर ग्रामस्थ करू शकतात परंतु सद्या हे ऐतिहासिक शस्त्र विजया दशमीचा मानकरी ट्रस्ट कमिटीने पत्र्याच्या लोखण्डी पेटीत ठेवला आहे.

जयाद्री कुशीतील नयनरम्य असा दोन पालख्यांचाभेटीचा विजयदशमी सोहळा लक्षवेधी ठरतो या सोहळ्याचे आयोजन मानपान रीतरिवाज परंपरे नुसार पिढ्यानपिढ्या जेजुरीकर करत आले आहेत विजयदशमी शिस्तब्ध आणि शांततेत पार पाडण्याकरिता नियोजन आयोजन बैठकीत खान्देकरी मानकरी मंडळ अध्यक्ष जालिंदर खोमणे पालखी मानकरी सचिन पेशवे राजाभाऊ पेशवे माळवदकर, पाटील,खोमणे, नाईक, कुडाळकर, मोहरकर, कुदळे, झगडे बारभाई, दीडभाई सातभाई,आगलावे,हरिश्चंद्रे, सेवेकरी,, खाडे, बेलसरे, गाडगे, सोनवणे, वीरकर, बयास, गोडसे, मोरे, शेरे, वासकर, मुलाणी, पानसरे,उबाळे, जगताप, रत्नपारखी, शिंदे, बारसडे. दोडके डीखळे, भालेराव समस्त ग्रामस्थ उपस्तिथ होते तर मार्तंड देवसंस्थानचे मंगेश घोणे, ऍड पांडुरंग थोरवे, ऍड विश्वास पानसे, आणि जेजुरी पोलीस नगरपालिका प्रतिनिधी उपस्तिथ होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button