‘केईएम’ ची आरोग्य यंत्रणा ‘‘मृत्युचा सापळा’’
आरोग्य मंत्री लक्ष देतील काय? : असहाय गोरगरिबांचा जातोय जीव

मुंबई । शीतल करदेकर ।
दि १४ जानेवारी २०२५ला पहाटे ४ला (८ तास उपचाराविना तडफडून थंड पडलेल्या) हरीष रामचंद्र करदेकर यांना आँक्सिजन लावले. थंड स्ट्रेचरवर ब्लडप्रेशर वाढण्याची प्रतिक्षा .. यंत्रणेला हलवल्यावर सकाळी ७ च्या दरम्यान वेन्टिलेटर काढला गेला. त्याच दिवशी वाँर्ड नं २० मध्ये खूप काही घडलं… एक जीव बळी गेला. आता आणखीन भयंकर घटना समोर आली.
मृत सौ.तेजस्विनी किरण पाटील सोबत त्यांचा १ महिन्याचा प्रीमॅच्युअर्ड मुलगा यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे पती किरण नरेंद्र पाटील यांच्या सोबत घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. केईएममध्ये मोठ्या सोयी मोठे डॉक्टर्स आहेत म्हणून पेशंट इथे येतात! पण इथे तसं काही नसून इथल्या डॉक्टर्स व यंत्रणेच्या हाती असलेली छळ छावणी आहे. इथे आजारी माणूस योग्य उपचारासाठी तडफडतो.
अपुरी मशिनरी ,औषधाच आणि सगळंच दुष्टचक्र, मोठं रेकेट आहे. योजना कागदोपत्री मंजुर होते पण लाभ होतं नाही. औषधे नाही . मग याचं पुढे काय,पेशंटसाठी आणलेली औषधं,प्लेटलेट्स, रक्त याचा उपयोग पेशन्टसाठी झाला नाही तर पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
केईएमच्या बेजबाबदार यंत्रणेचा बळी ठरलेले हरीष करदेकर यांच्या बाबतचा संतापजनक अनुभव त्यांच्या पत्नी व ‘‘महाईन्यूज’’ व्यवस्थापकीय संपादक शीतल करदेकर यांना आला. या कृतरतेचा कळस असलेल्या यंत्रणेमुळे करदेकर यांची कधीही भरुन न येणारी हानी झाली आहे.
अशी एकच नाही, दिवसागणिक अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यामध्ये लक्ष घालावे आणि संपूर्ण केईमच्या जबाबदार डॉक्टर व अधिकाऱ्यांवर कठोर करावाई करावी, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा – घरगुती ग्राहकांना कमर्शियल वीजदर नाही; महावितरणचे स्पष्टिकरण
पेशंटला घाबरवणारे डॉक्टर तो मरणार ,रिपोर्ट येण्याआधी भाकीत कसं करतात? बाळंतपण डिलेवरी रूममध्ये न होता दुसऱ्या वाँर्डमध्ये इतर पेशंटच्या नातेवाईकांसमोर का होते सीसी टिव्हीत रेकॉर्ड का होते? तिथेच आंघोळ घालण्याची जबरदस्ती पुरुष व महिला डॉक्टर कशी करु शकतात? बोनमँरो.चं दुकान सूरु आहे. अशी खूप भयंकर मनमानी छळणारी अपमानित करणारी राक्षसी जमात इथे कार्यरत आहे, असा संताप रुग्णांच्या नातेवाईकांमधून होतो आहे.
पार्टटाइम प्रशासन नको…
केईएम सारख्या रुग्णालयामध्ये सरकारने फक्त योजना घोषणा,उद्घाटन करून आपले काही आरोग्य दूत पगारी दलाल ठेवून चालणार नाही. इथे सगळा हमामच नंगा काळाकुट्ट आहे; काही अपवाद.वगळता! इथे.खड्यातले च़ांगले तांदूळ वेचून काम पुढे नेणे आवश्यक आहे. अनियंत्रित यंत्रणा नियंत्रणात आणण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा! अशी भयंकर परिस्थिती मनपा व सर्व हाँस्पिटल्सची आहे.
तितक्याच ताकदीने काम करणाऱ्या मंत्री सरकारी अधिकाऱ्यांची आहे. इथे.पार्टटाइम प्रशासन नको।२४ तासाचे संवेदनशील नियंत्रण करणारे अधिक्षक हवेत, अशी मागणी मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा आणि पीडित शीतल करदेकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
गर्भवती महिलेचा उपचारअभावी मृत्यू…
मृत सौ.तेजस्विनी किरण पाटील सोबत त्यांचा १ महिन्याचा प्रीमॅच्युअर्ड मुलगा यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांचे पती किरण नरेंद्र पाटील यांच्या सोबत घडलेला प्रकार अत्यंत गंभीर आहे. ज्या प्रकारे गरोदर व कँन्सरची लक्षणे दिसलेल्या तेजस्विनी पाटील यांच्यावर उपचार केले गेले. जननी सुरक्षा योजना, राजीव गांधी योजना, कँन्सर पेशंट एड या सगळ्यात योजना लागू करूनही औषधे इंजेक्शन नाही. मिळालेल्या इजेक्शन चा उपयोग डॉक्टर करत नाही. एमआयसीयू वॉर्डमधील झालेली डिलेवरी तेथील सर्वलोकांनी पाहिली सीसी टीव्हीत रेकॉर्ड झाली. डिलिव्हरी होऊ लागली तेव्हा डॉक्टर व नर्स उपस्थित नव्हत्या, अशी आपबिती पीडित किरण पाटील यांनी सांगितली आहे.