TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई
सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नाही -फडणवीस
मुंबई : कोणीही महिलांबद्दल अपशब्द काढणे योग्य नाही, ते अतिशय चुकीचे आहे. मात्र हा नियम आमच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही लागू आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. राज्यात गेले दोन दिवस आंदोलन सुरू आहे. त्यामुळे या संदर्भात बोलताना फडणवीस यांनी सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन करणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र दोन्ही बाजूंकडून आचारसंहिता पाळणे गरजेचे असल्याचे मतही फडणवीस यांनी व्यक्त केले.





