ताज्या घडामोडीपुणे
कोये येथे सापडले स्त्री जातीचे नवजात अर्भक
पुणे | खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कोये येथे भरपावसात चार तासांपूर्वी जन्मलेले नवजात स्री जातीचे नवजात अर्भक आढळून आले आहे. सदरची घटना शुक्रवारी (दि. १३ ऑगस्ट ) पहाटे उघडकीस आला. उषाबाई हिरामण राळे या महिलेला सर्वप्रथम या नवजात बाळाचा रडण्याचा आवाज आला.
त्यांनी स्थानिक येथील पोलीस पाटील साहेबराव राळे यांना त्यांनी या घटनेबाबत माहिती दिली. गावातील ग्रामस्थांनी सबंधित बाळाला पाईट येथील दवाखान्यात उपचारासाठी नेले. बाळ ठणठणीत असून, बाळाचे वजन तीन किलो आहे. चार तासांपूर्वी हे अर्भक जन्मल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कांबळे यांनी वर्तविला आहे.
चाकण पोलिसांच्या मदतीने नवजात बाळाला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविल्याचे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.





