ताज्या घडामोडीमुंबई

धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारची मंजुरी

मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली

मुंबई : मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली आहे, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प क्लस्टर-आधारित विकास तंत्रावर भर देतो, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट परिसर असतील. प्रत्येक क्लस्टरमध्ये विविध निवासी, व्यावसायिक आणि सामाजिक सुविधा असणार आहेत, यासोबतच यामध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान आणि लघु उद्योजकांसाठी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. धारावीमधील रस्त्यांचा देखील विकास करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात या प्रकल्पाचे काही प्रमुख वैशिष्ट्ये.

१. योजनात्मक धोरण

धारावी मास्टर प्लॅन तीन मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहे

– पुनर्विकासाच्या माध्यमातून आर्थिक परिवर्तन – सशक्त पर्यावरण व पायाभूत रचना – सर्वसामावेशक धारावी

२. खुल्या जागांची जोडणी

मोठ्या शहर उद्यानांपासून ते छोट्या मोहल्ला मैदानांपर्यंत एकत्रित व सुसंगत सार्वजनिक व हरित जागा उपलब्ध करून देण्यात येतील. या जागा चालण्याजोग्या असतील, आणि धारावीतील प्रत्येक नागरिकासाठी सहज उपलब्ध असतील. यामुळे पर्यावरणीय संतुलन राखले जाईल व जीवनमान उंचावेल.

३. सेंट्रल ‘हार्ट स्पेस’

धारावीच्या मध्यभागी एक मोठी खुली जागा तयार केली जाईल, जी केवळ धारावीकरांसाठी नव्हे, तर संपूर्ण मुंबईसाठी सण-समारंभ, कार्यक्रम यासाठी खुली असेल.

४. चालण्यायोग्य व वाहतूक-केंद्रित विकास

धारावीमध्ये बहुस्तरीय वाहतूक सुविधा उभारण्यात येणार आहेत. नवीन मेट्रो मार्ग, बस फीडर सेवा, सायकल व पादचारी मार्ग, लहान रस्ते एकमेकांशी जोडले जातील अशी रस्ते संरचना यामुळे नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचणे शक्य होईल.

हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

५. बहुपर्यायी वाहतूक केंद्र – मल्टी-मोडल ट्रान्झिट हब (MMTH)

धारावीच्या मध्यभागी अशा प्रकारचा पहिलाच ट्रान्झिट हब उभारण्यात येईल जिथे आंतरशहर, अंतर्गत शहर, उपनगरी रेल्वे, मेट्रो, हाय-स्पीड रेल्वे, विमानतळ एक्सप्रेस, बस व अन्य वाहतूक सेवा एकत्रित असतील. प्रवासी येथे आपले सामान तपासणीसाठी ठेवून, या केंद्रातील विविध सुविधा उपभोगू शकतील.

या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधा

– २४x७ किरकोळ सेवा – उपहारगृहे, कॅफे व खरेदीसाठी सुविधा – कार्यालय व हॉटेल स्पेस – सेंट्रल अव्हेन्यूशी थेट संपर्क

६. सुलभ सामाजिक सुविधा

शाळा, आरोग्यसेवा व समुदाय केंद्रे अशा सुविधा चालण्याच्या अंतरावर असतील (५-१५ मिनिटे). प्रत्येक वसाहतीत सामाजिक व वाहतूक सुविधा जोडून स्वयंपूर्ण केंद्र विकसित केली जातील.

७. आधुनिक आरोग्य सुविधा

धारावी व महानगर परिसरात अत्याधुनिक रुग्णालये, पॉलिक्लिनिक्स, प्राथमिक उपचार केंद्रे व निदान केंद्रे उभारण्यात येतील, ज्यामुळे मध्य मुंबईतील वैद्यकीय पायाभूत सुविधा अधिक सशक्त होतील.

८. विविध उपयोग असलेली वसाहत

रहिवासी, व्यावसायिक व शैक्षणिक उपयोगांचे संतुलन राखून चालण्यायोग्य सुटसुटीत अशा वसाहती उभारल्या जातील, ज्यामुळे आर्थिक सुलभता निर्माण होईल आणि धारावीकरांना उत्तम पुनर्वसन मिळेल.

९. राहणी आणि उपजीविका एकत्र

उद्योगांसाठी योग्य, स्वच्छ व बांधकामदृष्ट्या मजबूत जागा दिल्या जातील. पात्र उद्योगांना व अपात्र युनिट्सना वाणिज्यिक जागा भाड्याने घेण्याचा पर्याय दिला जाईल. यामुळे धारावीचे अनोखे ‘लिव्ह-वर्क’ संस्कृती टिकून राहील.

१०. क्लस्टर विकास – सामूहिक विकास

प्रत्येक सामूहिक प्रकल्पांमध्ये सार्वजनिक जागा असतील. बालकांसाठी सुरक्षित खेळाच्या जागा व उपकरणे असतील.

११. नदी काठ व जलाशय पुनरुज्जीवन

मिठी नदीच्या काठाशी एक सुंदर ‘धारावी प्रोमनेड’ तयार केला जाईल जो शहरातील दुसरा सर्वात मोठा वॉकवे असेल (मरीन ड्राइव्हनंतर). ही जागा सर्व वयोगटांसाठी सामाजिक व विरंगुळ्याचा केंद्रबिंदू बनेल.

१२. ओळख निर्माण व ठिकाणांचे सजीवपण

धारावीसाठी सुसज्ज रस्ते, सार्वजनिक जागांवर सहज प्रवेश असेल, ज्यामुळे परिसर अधिक सुरक्षित, सुसंगत वाटेल.

१३. प्रस्तावित रस्त्यांचे जाळे

सुमारे २१ किमी लांबीचे नवीन व रूंदीकरण केलेले रस्ते (९ मी ते ३६ मी रुंद) तयार होतील. दर १२५ मीटर अंतरावर एक जोडरस्ता असेल, जे विविध वसाहती एकमेकांशी जोडतील व मुख्य रस्त्यांवरील ताण कमी करतील.

१४. ग्रीन स्पाईन

माहीम निसर्ग उद्यानापासून रेल्वे भागापर्यंत एका हिरवळीत समृद्ध ‘ग्रीन स्पाईन’ तयार केला जाईल. यात सेंट्रल बायोस्वेलचा समावेश असेल, जे पूर व्यवस्थापनासाठी उपयोगी ठरेल.

१५. धार्मिक स्थळे

सर्व धर्मांच्या अनुयायांसाठी जागतिक दर्जाची धार्मिक संकुले उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकाला आपल्या निवासाजवळ श्रद्धा व उपासनेसाठी सुविधा मिळतील.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button