Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
#Covid-19: 24 तासांत 144 पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग; एकूण कोरोना बाधितांची संख्या 24,023

मुंबई: मागील 24 तासांत 144 पोलिसांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असून पोलिस दलातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 24,023 वर पोहचलेली आहे. त्यापैकी 21,030 पोलिसांनी कोरोनावर मात केली असून सध्या 2,743 पोलिसांवर उपचार सुरु आहेत. एकूण 250 पोलिसांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेलेला आहे.





