अंबानींच्या घरी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागेल
मुकेश अंबानींच्या घरी नोकरी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे शिक्षण असणे फार गरजेचे आहे.

मुंबई : मुकेश अंबानी हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांच्या अँटीलिया या निवासस्थानी हजारो लोक काम करतात. मुकेश अंबानींच्या घरात जवळपास ६०० कर्मचारी काम करतात. या ठिकाणी २४ तास नोकर असतात. विशेष म्हणजे त्यांच्या घरातील नोकर हे विविध शिफ्टमध्ये काम करतात.
अंबानींच्या घरात झाडू मारण्यापासून ते स्वयंपाक करण्यापर्यंत, भांडी घासण्यापासून आणि कपडे धुण्यापर्यंत विविध कामं करण्यासाठी नोकर आहेत. जर तुम्हाला अंबानींच्या घरी नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतात.
मुकेश अंबानींच्या घरी नोकरी मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीचे शिक्षण असणे फार गरजेचे आहे.अंबानींच्या घरात काम करणारे कर्मचारी म्हणून भरती होण्यासाठी अनेक प्रक्रियेतून जावं लागतं. त्यानतंरच तुम्हाला अँटेलिया या ठिकाणी कामावर रुजू केले जाते.
हेही वाचा : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड नामांकित कंपन्यांकडून केली जाते. या ठिकाणी नोकरी मिळविण्यासाठी उमेदवाराकडे हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
तसेच त्याची लेखी परीक्षादेखील घेतली जाते, त्यात तो उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.मुकेश अंबानींच्या अँटिलियामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शाही सुविधा मिळतात. या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी खाजगी खोल्या देखील दिल्या जातात.
रिपोर्ट्सनुसार, अंबानींच्या अँटिलियामध्ये काम करणाऱ्यांना मोठ्या रक्कमेचे पगार मिळतो. अँटिलियामधील सफाई कामगार आणि फरशी पुसणारे दर महिन्याला २ लाख रुपये कमवतात. यात वैद्यकीय भत्ता, शिक्षण भत्ता याचाही समावेश असतो.