Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
रत्नागिरीत ५० फूट खोल दरीत कोसळली बस; चिमुकल्याचा मृत्यू
रत्नागिरी – रत्नागिरीत कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबईहून कणकवलीच्या दिशेने जात असताना पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण २७ प्रवासी होते. त्यापैकी २५ जणांना बाहेर काढण्यात आले असून एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरु करत २५ जणांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने सात वर्षाच्या एका लहान मुलाला या अपघातात जीव गमवावा लागला. जखमींना पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण समजले नसून पोलीस तपास करत आहेत.





