लग्नाळू तरूणांच्या नवसाला पावणारा नवश्या मारूती
छत्तरपूर जिल्ह्यातील महोबा रोडवर असलेले हनुमान मंदिर थेट त्रेतायुगशी संबंधित
राष्ट्रीय : सध्या लग्नासाठी इच्छूक असलेल्या अनेक तरूणांची लग्न ठरत नाहीयेत. त्यांना अपेक्षित वधू मिळत नाहीय. कारण, मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण, याच लग्नाळू लोकांच्या इच्छा पूर्ण करणारा हनुमंत भारतात आहे. या मंदिरातील मूर्ती बंधिस्त अवस्थेतील आहे. त्यामागे पौराणिक कारण आहे.कुठे आहे हे मंदिर जाणून घेऊयात.
मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्ह्यात मारूतीरायांचे एक पुरातन मंदिर आहे. श्री मारूतीरायांच्या मंदिरात असतात तसे याही मंदिरात भगवंतांची शेंदूराने माखलेली मूर्ती आहे. पण हे एकमेव असे मंदिर आहे जिथे मारूतीराया बांधलेल्या अवस्थेत आहे.
छत्तरपूर जिल्ह्यातील लवकुश नगरच्या महोबा रोडवर असलेले हनुमान मंदिर थेट त्रेतायुगशी संबंधित आहे. रामायणातील नंतरच्या काळात जेव्हा राम पुत्र लव आणि कुश यांचा जन्म झाला तेव्हाची ही गोष्ट आहे. लव आणि कुश यांनी श्री रामांचा अश्वमेध घोड्याला बांधून घातले होते. या घोड्याला वाचवण्यासाठी अनेक पराक्रमी आणि शूर योद्धे गेले. जेव्हा सगळे थकले तेव्हा हनुमंतांना पाठवले.
घोडा परत आणण्यासाठी हनुमंत स्वत: वनात गेले तेव्हा माता लव आणि कुश यांनी त्यांनाही बंदी बनवले. त्यांच्या कमरेला दोरखंड बांधला अन् त्यांना बांधून घातले. यानंतर माता सीता म्हणाली, हनुमंत म्हणजे माझा मोठा पुत्र आहे. तुम्ही तुमच्या मोठ्या भावाला बंदिस्त केले आहे. त्यानंतर लव कुश यांनी हनुमंताला सोडले. पण त्याच रूपातील ही मूर्ती आजही या मंदिरात आहे. भगवंताची ही मूर्ती एका दोरीने बांधलेली आढळते.
प्राचीन काळापासून या स्थानावर ही मूर्ती अस्तित्वात आहे. पण ती किती जुनी आहे याचे नेमके वर्ष सांगता येणार नाही. उत्तर प्रदेशातील मौडोहा येथील भाविक वर्षानुवर्षे येत असल्याचे सांगतात. या भाविकांच्या मुलाच्या लग्नात अडथळे येत होते. तेव्हा या मारूतीला नवस केला अन् त्याचे लग्न जुळले, त्यामुळे येथे भाविकांची गर्दी असते.
महोबाहून आलेल्या पार्वती सांगतात की ती लहानपणापासून ही मूर्ती पाहत आहेत. आमच्या अनेक इच्छा पूर्ण झाल्या आहेत. दर मंगळवार-शनिवारी या मंदिरात हजेरी लावतात. ज्याची मनापासून इच्छा असेल, हनुमानजी त्या सर्व लोकांचे कल्याण करतात. या पवित्र स्थानावर कोणतीही गाठ बांधल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.





