Breaking-newsमुंबई

पादचारी पुलांसाठी ७० कोटी रुपयांची निविदा

  • सीएसएमटी ते कसारा, कल्याण ते कर्जतदरम्यान सुविधा

दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास महामंडळ) मध्य रेल्वेवरील १२ ठिकाणी पादचारी पूल उभारतानाच अन्य सुविधा दिल्या जाणार आहेत. यासाठी एमआरव्हीसीकडून ७० कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आली आहे. हे पूल सीएसएमटी ते कसारा व कल्याण ते कर्जतदरम्यान असतील, अशी माहिती देण्यात आली.

रेल्वे रूळ ओलांडताना मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर मोठय़ा प्रमाणात अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी एमआरव्हीसीकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी रेल्वे स्थानकात व दोन स्थानकांदरम्यान पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, पादचारी मार्गिका, भुयारी मार्ग उपलब्ध करण्याचे नियोजन केले. प्रथम बारा रेल्वे स्थानकांत या प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता दोन स्थानकांदरम्यान रूळ ओलांडण्याचे अपघात रोखण्यासीठी नियोजन केले जात आहे. यासाठी ३६ ठिकाणे निश्चित करताना एमयूटीपी- ३ अंतर्गत एमआरव्हीसीने २६ पादचारी पूल व अन्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला. ही योजना तीन टप्प्यांत राबविली जात आहे. त्यानुसार हार्बरवरील पुलांच्या कामांसाठी कंत्राटदारांची नियुक्ती केली असून हे काम सप्टेंबरपासून सुरू केले जाईल.

आता मध्य रेल्वेवरील आणखी बारा ठिकाणीही सुविधा देण्यासाठी ७० कोटी रुपयांची निविदा जारी करण्यात आल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले. सीएसएमटी ते कसारा, कल्याण ते कर्जतदरम्यान पादचारी पूल व अन्य सुविधांचा समावेश असेल. यामध्ये अंबरनाथ स्थानकात एक नवीन पादचारी पूल व सीएसएमटीच्या दिशेने असणाऱ्या पुलाचा विस्तार, तर बदलापूर स्थानकात पूल व फलाटाचे काम केले जाणार आहे. त्याचप्रमाणे शहाड, आंबिवली, वांगणी यांसह अन्य काही स्थानकांदरम्यानही पूल व सुविधा दिल्या जातील, अशी माहिती देण्यात आली.

रूळ ओलांडताना मध्य व पश्चिम रेल्वेवर झालेल्या अपघातातील मृत्यू

वर्ष २०१७ : १,६५१ जणांचा मृत्यू

वर्ष २०१८ (जुलैपर्यंत) : ९२८ जणांचा मृत्यू

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button