breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

“मुंबई उडवणार…” पोलिसांना मिळाली धमकी, प्रशासन अलर्ट मोडवर

मुंबई : नवीन वर्ष येणार आहे आणि मोठ्या शहरांमध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली आहे. जुन्या वर्षाचा निरोप घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आता संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांनीही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मुंबईतही नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र नवीन वर्षाचे जल्लोष सुरू असतानाच मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला असून त्यात नववर्षाच्या दिवशी मुंबई शहरात बॉम्बस्फोट होतील, अशी धमकी पोलिसांना देण्यात आली आहे. या कॉलनंतर पोलीस कॉल करणाऱ्याला शोधण्यात व्यस्त आहेत.

कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सर्व पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेला अलर्ट मोडवर ठेवले आहे. मुंबई पोलिसांनी सांगितले की,शनिवारी संध्याकाळी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी तपास केला मात्र अद्यापपर्यंत कोणताही पुरावा मिळालेला नाही. हा कॉल कोणी आणि का केला याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

हेही वाचा – हातमोजे बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

मुंबईला उडवण्याची धमकी पोलिसांना मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुंबई पोलिसांना अनेक धमकीचे फोन आले आहेत. मात्र नंतर हे सर्व कॉल फेक असल्याचे सिद्ध झाले. जे फक्त मुंबई पोलिसांना घाबरवण्यासाठी आणि धमकवण्यासाठी केले जाते.२०२२ मध्ये मुंबई पोलिसांना मुकेश अंबानी यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली होती. या वर्षीही एका व्यक्तीने मुंबई पोलिसांना त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून धमकी दिली होती की, तो मुंबईत स्फोट घडवून आणणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button