breaking-newsमनोरंजन

सोनमच्या बहिणीच्या बॉयफ्रेंडने घेतली अनिल कपूरची भेट

सोनम कपूरचे लग्न झाले आणि आता तिच्या धाकट्या बहिणीने रियानेही आपले सूत जुळवायचा प्रयत्न केला. तिच्या बॉयफ्रेंडने नुकतीच अनिल कपूरची भेट घेतली. मुंबईतल्या एका रेस्टॉरंटच्या बाहेर या दोघांना बोलताना बघितले गेले होते. “रेस 3’चे यश सेलिब्रेट करण्यासाठी अनिल कपूर, पत्नी सुनिता आणि रिया बांद्रयातल्या एका रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले होते. तिथेच डायरेक्‍टर करण बुलाणीही आला होता.

रिया आणि करण काही दिवसांपासून डेट करत आहेत. करण बुलाणीने यापूर्वी “आयशा’ आणि “वेकअप सिड’ सारख्या सिनेमांसाठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम केले होते. याशिवाय अनेक सिनेमांसाठी असिस्टंट डारेक्‍टर, प्रोड्युसर आणि डबिंगचे कामही त्याने केले आहे. 2010 मध्ये “आयशा’मध्ये एकत्र काम करण्याच्या निमित्ताने करण आणि रियाची ओळख झाली होती.

तेंव्हापासून त्यांचे अफेअर सुरू होते. सोनमच्या लग्नाच्या वेळीच करण आणि रिया यांनी आपली रिलेशनशीप उघड केली होती. रियाचा एक डान्स व्हिडीओ करणने शेअर केला होता आणि त्याखाली “माय गर्ल’ असे लिहीले होते. करण आणि रियाच्या लग्नाची बोलणीही सुरू झाली होती. करणच्या पालकांनी दिल्लीवरून मुंबईला येऊन अनिल कपूरशी चर्चाही केली होती. पण काही कारणामुळे लग्नाची तारिख निश्‍चित झाली नव्हती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button