breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: धक्कादायक! भारतातील मृत्यूदर चीन-अमेरिका आणि जर्मनीपेक्षाही जास्त- WHO

करोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. पण सुरूवातीच्या आकड्यांचं विश्लेषण केल्यास भारतामध्ये मृत्यूदराचं प्रमाण या देशांपेशा जास्त असल्याचं समोर आले आहे. भारतामध्ये करोना व्हायरस वेगानं परसरत असून रूग्णांची संख्या सात हजाराच्यापुढे गेली आहे. भारतात धीम्या गतीने करोना विषाणूचा प्रादुर्भाव होत आहे. यामध्ये चीन, अमेरिका आणि जर्मनी यांच्या तुलनेत भारतात करोनाचा संसर्ग हळूहळू वाढत गेला. मात्र आताची परिस्थिती पाहता. या देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर अधिक आहे.

करोना व्हायरस भारतामध्ये वेगान पसरत असून समुह संक्रमणाच्या दारात उभा आहे. दिवसागणिक भारतामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून मृतांची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. जागतिक आरोग्य संस्था (WHO)च्या जगभरातील देशांच्या स्थितीच्या रिपोर्ट्सनुसार अमेरिका, जर्मनी, चीनमध्ये सरासरी भारतामध्ये सध्या रुग्णांच्या संख्येइतकी संख्या असताना या देशातील मृत्यूचा आकडा खूप कमी होता. त्या तुलनेत भारतामध्ये जास्त मृत्यू झाले आहेत.

अमेरिका, चीन आणि जर्मनीमध्ये करोनामुळे झालेल्या मृत्यूचा सरासरी दर भारतापेक्षा खूप कमी आहे. WHO च्या रिपोर्ट्सनुसार भारतात आतापर्यंत एक लाख ७१ हजार जणांची करोना तपासणी झाली असून त्यापैकी ७,४४७ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत भारतात करोना व्हायरसमुळे २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा अमेरिकेत ७९८७ जणांना करोनाची लागण झाली होती तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. जर्मनी असा एकमेव देश आहे ज्यामध्ये ७१५६ जणांना करोनाची लागण झाल्यानंतर फक्त १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे करोनाचा केंद्रबिंदू असलेल्या चीनमध्ये पहिल्या ७७३६ करोना रूग्णांपैकी १७० जणांचा मृत्यू झाला होता. यावरूनच असा अंदाज लावला जातोय की इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चिंताजनक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार भारतामध्ये ७४४७ करोना रूग्णांपैकी २३९ जणांचा मृत्यू झाला आहे. याच आधारावर भाराताचा मृत्यूदर ३.२१ टक्के इतका आहे. दुसरीकडे अमेरिकेत ज्यावेळी ७०८७ जणांना करोनाची लागण झाली तेव्हा १०० जणांचा मृत्यू झाला होता. त्यानुसार अमेरिकेचा मृत्यूदर १.४१ टक्के असा होतो. जर्मनीचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. जर्मनीमध्ये ज्यावेळी ७१५६ करोनाचे रूग्ण झाले तेव्हा फक्त १३ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच आधारावर जर्मनीचा मृत्यूदर ०.१८ टक्के आहे. सात हजार रूग्ण झाले तेव्हा चीनचा मृत्यू २.२ होता.

करोना व्हायरसच्या प्रादुर्भात आलेल्या सर्व देशांची परिस्थिती तेव्हा भयानक झाली जेव्हा संक्रमणाचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला. यामध्ये अमेरिकापासून ब्रिटन, इटली आणि स्पेनचा समावेश आहे. प्रसारमाध्यमांच्या रिपोर्टनुसार दहा हजारांचा आकडा पार केल्यानंतर करोना व्हायरसचा विषाणू आधिक घातक होतो आणि देशात दररोज ५०० ते ६०० पेक्षा आधिक रूग्ण दररोज निघतात. तसेच मृत्यूचा आकडाही दिवसागणिक वाढत जातो. त्यामुळे अमेरिका, इटली, स्पेनमध्ये करोनामुळे सध्या मृत्यूतांडव सुरू आहे. सध्यपरिस्थितीला अमेरिकेत दररोज दोन हजार लोकांचा मृत्यू होतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button