breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘हिंदू हा धर्म नाही तो एक..’; स्वामी प्रसाद मौर्य यांचं वादग्रस्त विधान

Swami Prasad Maurya : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस स्वामी प्रसाद मौर्य यांनी हिंदू धर्म आणि सनातन धर्म याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हिंदू हा धर्म नाही तो एक धोका आहे, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वागाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक यांच्या नावाचाही उल्लेख केला.

स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले, हिंदू हा धर्म नाही तो एक धोका आहे. १९९५ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेच हे म्हटलं होतं की हिंदू हा धर्म नसून ती फक्त एक जीवनशैली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनीही एकदा नाही तर दोनवेळा असं म्हटलं आहे की हिंदू हा धर्म नाही तर जीवन जगण्याची कला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ही बाब म्हणून दाखवली आहे. हिंदू धर्माविषयी मी काही बोललं की सगळ्यांना मिरच्या झोंबतात. पण मी आज पुन्हा एकदा सांगतो हिंदू धर्म नाही तो एक धोका आहे.

हेही वाचा  –  Bank Holidays : जानेवारी महिन्यात १६ दिवस बँका राहणार बंद! 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं हिंदू हा धर्म नाही. दोन महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनीही याच आशयाचं वक्तव्य केलं होतं. जेव्हा मोहन भागवत, नितीन गडकरी, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा असं काही बोलतात तेव्हा कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. हिंदू हा धर्म नाही धोका आहे. काही लोकांसाठी हा धंदा आहे. मी या विषयी काही बोललो की लगेच लोकांच्या भावना दुखवतात, असं स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले.

दरम्यान, २५ डिसेंबरच्या दिवशी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महा ब्राह्मण पंचायत या कार्यक्रमात सहभाग घेतला होता त्यावेळी काही ब्राह्मण नेत्यांनी अखिलेश यादव यांच्याकडे स्वामी प्रसाद मौर्य यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आणि तक्रारही केली. अखिलेश यादव यांनीही ही बाब मान्य केली की कुठल्याही धर्माच्या किंवा जातीच्या विरोधात अशा प्रकारे काही बोलणं गैर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button