breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

Supriya Sule : वाढदिवसानमित्त खासदार सुप्रिया सुळे यांचे कार्यकर्त्यांना खास आवाहन

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांचा उद्या ३० जून रोजी वाढदिवस असतो. वाढदिवसाच्या निमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी पुष्पगुच्छ आणि हार देत अभिष्टचिंतन करत असतात. मात्र यंदाच्या वाढदिवसानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना आवाहन..राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्यांना माझ्याप्रती असणारा जिव्हाळा व आस्था नेहमीच व्यक्त होत असते. उद्या माझ्या वाढदिवसानिमित्तही अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व शुभचिंतक प्रत्यक्ष भेटून आपल्या शुभेच्छा मला देण्यासाठी उत्सुक आहेत याची मला जाणीव आहे. आपणां सर्वांना मी एकच नम्र आवाहन करू इच्छिते की शुभेच्छूकांनी फुले, पुष्पगुच्छ, भेटवस्तू न आणता त्याऐवजी आपल्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या गरजू शाळकरी मुलांना पुस्तके, शालेय वस्तू, रेनकोट, भेटवस्तू आदींचे वाटप करावे.

हेही वाचा – Pune : चांदणी चौकातील वाहतूक ४ ते १५ जुलैपर्यंत बंद राहणार

https://twitter.com/supriya_sule/status/1674402600517791744

या सामाजिक उपक्रमाचे फोटो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करावेत, मी ते माझ्या सोशल मीडिया माध्यमांवर शेअर करेन. आपला पक्ष हा नेहमीच आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपत आला आहे. आपण हा गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रमही नेहमीच्याच तत्परतेने राबवावा, माझ्यासाठी वाढदिवसाची हीच अनमोल भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button