breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला; दररोज धूर फवारणी करण्याची नाना काटेंची मागणी

पिंपरी |

पिंपरी चिंचवड शहरातून वाहणार्या पवना नदीत जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच नदीकाठच्या भागात मच्छरांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागरमधील नागरिकांचे जनजीवन या मच्छछांमुळे हैराण झाले आहे. तरी महापालिका प्रशासनाने याची तातडीने दखल ख्यावी, तसेच या परिसरात मच्छरांचा बंदोबस्त करण्यासाठी दररोज धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

यासंदर्भात नाना काटे यांनी ‘ड’ प्रभागाचे आरोग्य अधिकारी यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्र.२८ रहाटणी-पिंपळे सौदागर मध्ये सध्या मच्छरांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे सोसायटीमधील व बैठ्या घरातील नागरिक विशेषतः ज्येष्ठ नागरिक व लहान मुले मच्छरामुळे हैराण झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून नागरिक आजारी पडत आहेत. त्यासाठी नागरिकांकडून मच्छरांबाबत अनेक तक्रारी येत आहेत. त्यावर नियंत्रणासाठी प्रभागामध्ये दररोज धूर फवारणी करण्यात यावी अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.

वाचा- जळगाव जिल्ह्यात लॉकडाउनचं संकट?; घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी होणार

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button