breaking-newsपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : महिंद्रा कंपनीकडून पोलिसांनाकरिता १० कार; लॉकडाउनसाठी मदत

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना आणखी गस्त घालून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करता यावी, यासाठी महिंद्रा कंपनीकडून 10 कार देण्यात आल्या आहेत. या कारवरील चालक देखील कंपनीकडून पुरविण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.

संपूर्ण देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन केले आहे. दरम्यान संचारबंदीचे आदेशही जारी करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या ठिकाणांसह एकूण 80 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 65 चेकपोस्ट उभारण्यात आला आहेत. चेकपोस्ट, नाकाबंदीची ठिकाणे यासह पोलीस शहराच्या अंतर्गत भागातही गस्त घालून संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करीत आहेत, असेही हिरेमठ यांनी सांगितले.

सध्या पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे 83 दुचाकी आणि 89 चारचाकी वाहने आहेत. मात्र, सध्या असलेली ही वाहने प्रभावी गस्त घालण्यासाठी कमी पडत आहेत. पोलिसांची ही अडचण दूर करण्यासाठी महिंद्रा कंपनी पुढे आली आहे. त्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत पोलिसांना गस्त घालण्यासाठी दहा कार उपलब्ध करून दिल्या आहेत. या कारवरील चालकही कंपनीकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांना वाहने उपलब्ध करुन दिली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button