breaking-newsताज्या घडामोडी

हैदराबादमध्ये कबड्डी स्पर्धेत गॅलरी कोसळून 100 पेक्षा अधिक जखमी

हैदराबाद – तेलंगणातील 47 व्या राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेच्या सूर्यापेट येथील उद्घाटनाच्या सामन्याला प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. त्यामुळे स्टेडियमच्या गॅलरीचा भाग कोसळला. त्यात 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्घटने कोणाचाही मृत्यू झाल्याची नोंद नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वाचा :-१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस घेता येणार

तेलंगणाच्या सूर्यापेट येथे राष्ट्रीय ज्युनियर कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना आयोजित करण्यात आला होता. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे स्टेडियमची प्रेक्षक गॅलरी कोसळून 1,500 पेक्षा अधिक जण खाली पडले. त्यात 100 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या कबड्डी सामन्यांसाठी 15,000 क्षमतेची प्रेक्षक गॅलरी बनवण्यात आली होती. देशातील 29 राज्यांचे संघ या कबड्डी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button