breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडी

चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा गेम्समध्ये भारताचे पदकांचे शतक पूर्ण

Asian Para Games 2023 : भारतीय खेळाडू चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई खेळ खेळण्यासाठी गेले होते. भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करत हे लक्ष्य पूर्ण केले आहे. सध्या १०० पदके जिंकली आहेत, मात्र ही संख्या आणखी वाढू शकते. एकूणच भारतीय खेळाडूंनी हांगझोऊमध्ये नवा इतिहास रचला आहे. यात २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताच्या मुलींनी कबड्डीमध्ये सुवर्णपदक जिंकले, हे भारताचे १०० वे पदक होते. यावेळी भारताने जकार्ता आशियाई क्रीडा २०१८ मध्ये ७० पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला. २०१८ मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण ७० पदके जिंकली होती. जकार्ता येथे भारताने १६ सुवर्ण, २३ रौप्य, ३१ कांस्य अशी एकूण ७० पदके जिंकली होती.

हेही वाचा – इंद्रायणीनगर येथे नवरात्रौत्सव २०२३ ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद 

१९५१ भारताची राजधानी दिल्ली येथे पहिल्या आशियाई खेळांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भारताने १५ सुवर्ण, १६ रौप्य आणि २० कांस्य जिंकली होती. १५ सुवर्णपदके जिंकणे ही त्यावेळी अप्रतिम कामगिरी होती, आशियाई क्रीडा स्पर्धेत १५ सुवर्णपदके जिंकण्याचा भारताचा विक्रम दीर्घकाळ अबाधित राहिला होता. भारताने एकामागून एक अनेक आशियाई खेळ खेळले, परंतु १५ सुवर्ण जिंकण्याचा विक्रम कायम राहिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button