breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! भिंत कोसळून पाच वर्षांचा मुलगा ठार; ग्रेटर नोइडाला धुळीच्या वादळाचा तडाखा

नोइडाला धुळीच्या वादळाचा तडाखा बसल्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून एक पाच वर्षांचा मुलगा ठार झाल्याची घटना घडल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दानकौर परिसरातील चुहादपूर गावामध्ये रविवारी ही घटना घडली. हा मुलगा घराजवळ खेळत असताना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या भिंतीजवळ आला तेव्हा अचानक भिंत कोसळली आणि लहानगा त्याखाली गाडला गेला, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेनंतर लहानग्यास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. करोनामुळे टाळेबंदी जारी करण्यात आली असल्याने भिंतीचे बांधकाम बंद करण्यात आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रविवारी गौतमबुद्ध नगर आणि दिल्लीतील अन्य परिसरांना धुळीच्या वादळाचा मोठा तडाखा बसला त्यानंतर पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button