breaking-newsTOP Newsआरोग्यताज्या घडामोडी

आला पावसाळा आता आरोग्य सांभाळा! अशी घ्या आरोग्याची काळजी

हातपाय स्वच्छ धुणे : पावसाळाच्या दिवसात कोणत्याही ठिकाणी विषाणू बसलेले असतात. त्यामुळेच बाहेरुन आल्यानंतर अन्न पदार्थ खाण्याआधी किंवा घरभर फिरण्याआधी हात पाय स्वच्छ धुवावे. तसेच हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ ठेवावेत.

रस्त्यावरचे अन्न खाणे टाळावे : पावसाळ्यात कोणत्याही आजारला आपण लवकर बळी पडतो. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवणे महत्वाचे असते. अनेकदा बाहेरचे पदार्थ बनवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली गेली नसली तर असे पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब किंवा अन्न पचनासंदर्भातील आजार होण्याची शक्यता असते . त्यामुळे रस्त्यावरचे पदार्थ खाणे टाळावे.

डासांपासून सुरक्षित रहा : पावसाळ्याच्या दिवसांत डासांचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते. अशावेळी घरात किंवा घराच्या आसपास पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण साठलेल्या पाण्यात डासांची संख्या जास्त होते. डासांमुळे डेंगू मलेरियासारखे आजार पसरतात. डासांना दूर ठेवण्यासाठी क्रीमचा वापर करा.

हेही वाचा – ‘आदित्य ठाकरेंचा उद्याचा मुक्काम जेलमध्ये..’; संजय शिरसाट यांचं मोठं विधान

योग्य आहार आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवा : पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असते तेव्हा सकस, शुद्ध, पोषक आहाराला प्राधान्य द्यावे. घरचे अन्न खावे. भाज्या, फळे रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत करतात. चांगलं अन्न खाल्ल्याने खोकला, सर्दी, ताप, अशा पावसाळी आजरांपासून सहज संरक्षण मिळते.

आंबट गोष्टी खाणे टाळावे : पावसाळ्यात आंबट गोष्टी खाणे टाळावे. आंबट गोष्टींमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढून शरीराला सूज येण्याची शक्यता असते. त्यामूळे आंबट गोष्टी खाणे टाळावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button