breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ म्हणून चक्क पुरुषांनी घातली वटवृक्षाला प्रदक्षिणा

पिंपरी – मानवी हक्क संरक्षणच्या वतीने ‘हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी’ म्हणून चक्क पुरुषांनी हातात दोरा घेऊन वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली आणि आपल्या पत्नीला निरोगी आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.

पिंपरी-चिंचवडच्या नवी सांगवी परिसरात आज अनोखी वटपौर्णिमा पाहायला मिळाली. गेल्या चार वर्षांपासून निरंतर हा अनोखा उपक्रम सुरू आहे. यासाठी श्रीकांत जोगदंड हे अविरतपणे काम सुरू आहे.आज स्त्री, सावित्री जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करते. मात्र, आधुनिक काळातील सत्यवान म्हणजचे आजचे पुरुष यांनी वाजत गाजत वटवृक्षाला दोऱ्याने सात फेऱ्या मारून हीच पत्नी मिळावी यासाठी प्रार्थना करून स्त्री पुरुष समानतेचा संदेश दिला आहे.

यावेळी अनेक पुरुषांनी या अनोख्या आणि आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता. हात पुढे करून सर्व पुरुषांनी हीच पत्नी मिळू दे यासाठी शपथ घेतली. आजच्या आधुनिक युगात केवळ सरकारी कागदावर स्त्री पुरुष समानता दिसते. अशा उपक्रमामुळे समजात नक्कीच बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं बोललं जात आहे.

यावेळी अरुण पवार यांचे हस्ते वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष विकास कुचेकर, शहराध्यक्ष आन्ना जोगदंड, उपाध्यक्ष विकास शहाणे, सचिव गजानन ,धाराशिव कर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार ,प्रविण गायकवाड, युवक सचिव अक्षय जगदाळे, हेमंत नेमाडे आळंदी शहर सचिव रवि भेंनकी, आप्पाजी चव्हाण ,प्रकाश बंडे्वार ,हनुमंत पंडित,वसंतराव चकटे , पंडित वनसकर, वामन भरगंडे, सुर्यकांत कुरुंदकर, राजेंद्र गोराने, मुरलीधर दळवी ईश्वर सोनोने सचिन सागवे बदाम कांबळे, विनायक बिराजदार, प्रदिप बोरसे,रविंद्र सुरवे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button