breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर, शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली रक्कम

मुंबई | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. या यादीत 15 जिल्ह्याचा समावेश आहे. दरम्यान सहा जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे 6 जिल्हे वगळून जिल्हे वगळून 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

दुसऱ्या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील दोन लाख 52 हजार 483 जणांची तर वर्धातील 46 हजार 424 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वर्धा जिल्हा प्रशासनाकडून आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वर्ध्यातील पहिल्या यादीत दोन गावांतील 166 शेतकऱ्यांचा समावेश होता. यापैकी 154 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. आता या मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button