पिंपरी / चिंचवड

बचत गटाचे पैसे भरण्यासाठी जात असलेल्या महिलेला लुटले

पिंपरी l प्रतिनिधी

महिला बचत गटाचे पैसे भरण्यासाठी जात असलेल्या एका महिलेला अनोळखी व्यक्तीने लुटले. ही घटना सोमवारी (दि. 11) दुपारी सव्वाचार वाजता पिंपळे गुरव येथे घडली.

स्मिता जयेश पिल्ले (वय 40, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास बचत गटाचे पैसे भरण्यासाठी जात होत्या. त्या पिंपळे गुरव येथील महाराष्ट्र बँकेसमोर आल्या असता एक अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी यांच्या हातातील 11 हजार 280 रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button