breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘उद्यान’ अधिक्षक अडकणार चाैकशीच्या फे-यात; देखभाल व अनुषंगिक कामांच्या निविदांची चाैकशी सुरु

आयुक्त श्रावण हर्डिकर यांचे चाैकशी आदेश, उद्यान विभागात अनागोंदी कारभार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील देखभाल व अनुषंगिक कामाच्या निविदा प्रक्रियेत अनागोंदी कारभार सुरु आहे. उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती, स्वच्छतागृहाच्या सफाईच्या 14 कामांच्या निविदा, तसेच 23 उद्यान कामांच्या निविदा प्रसिध्दी केल्या. त्यात प्रत्येकी एका ठेकेदाराला विभागून कामे देण्यात आली. यामुळे उद्यानातील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून तेथील उद्यान अधिक्षक चाैकशीच्या फे-यात अडकणार आहेत. दरम्यान, त्या रिंग झालेल्या सर्व निविदांची चाैकशीचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकारांना दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उद्यानांच्या देखभाल व अनुषंगिक कामाच्या निविदा प्रक्रियेत रिंग करुन मर्जीतील ठेकेदारांवर अधिका-यांनी मेहेरबानी दाखविली आहे. स्पर्धक ठेकेदारांना अनुभव प्रमाणपत्रावरुन अपात्र ठरवत उद्यानांची ‘प्रत्येकाला एकच काम’ याप्रमाणे 23 उद्यानांच्या कामांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच महापालिकेने उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती, स्वच्छतागृहाच्या सफाईच्या 14 कामांच्या निविदा गोंधळ घातला आहे.

त्या कामातील तांत्रिक आणि अर्थिक पाकिट एकाच दिवशी उघडण्यात आले आहे. त्यामध्ये भोसरी सहल केंद्रातील उद्यानाच्या 1 कोटी 85 लाख आणि भोसरी प्राधिकरण पेठ क्रमांक सात येथील 1 कोटी 28 लाख रुपयांच्या कामात रिंग झाल्याचे समोर आले आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाच्या 95 लाख 55 हजार, निगडी प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान 1 कोटी 64 लाख आणि दुर्गा देवी उद्यानातील 1 कोटी 50 लाख या कामाच्या अपात्र ठेकेदारांने उद्यान अधीक्षकांनी चुकीचे दाखले दिले आहेत. त्या आधारे त्यांना पात्र केले आहे.

महापालिकेतील उद्यान विभागाने 23 उद्यानांच्या देखभाल व अनुषंगिक कामांच्या निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्या उद्यानांची कामे प्रत्येकाला एकच याप्रमाणे वाटप करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक उद्यानांचे काम दोन वर्षांचे असून सुमारे एक ते दोन कोटी रुपयांचे कामांच्या निविदा आहेत. त्यात कामातही रिंग झाली असून मर्जीतील ठेकेदारासाठी निविदेच्या अर्टी व शर्थी देखील बदलण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे 23 उद्यानाच्या टेंडर देखील पुन्हा एकदा ठेकेदारांना काम देण्याची प्रक्रियेवरुन संशयाच्या भोव-यात सापडले आहे.

दरम्यान, उद्यान देखभाल व अनुषंगिक कामाच्या निविदा प्रक्रिया संशयाच्या भोव-यात सापडली आहे. उद्यान अधिक्षकांनी अटी व शर्थीत बदल करुन सत्ताधारी कारभा-याच्या मर्जीतील ठेकेदारांना सांभाळलेले आहे. त्या सर्व ठेकेदारांना विभागून प्रत्येकी एक अशा प्रकारे कामाचे वाटप केले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत स्पर्धा न होता, त्या-त्या ठेकेदारांना आलटून-पालटून कामांचे वाटप करण्यात आलेले आहे. त्या सर्व कामांची चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले आहे. त्या निविदांमध्ये रिंग झाल्याचे आढळल्यास सर्व निविदा रद्द करण्यात येतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button